अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लवकरच आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचा गेट-टुगेदर मोठ्या उत्साहांत साजरा करू या..!! सर्वांचा परिचय आणि सर्वांची ओळख होणार.!!
संगीता इनकर मॅडम सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून रोखठोक महाराष्ट्र ग्रुपमधील पत्रकार बांधव व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून भंडारा किंवा टुगेदरचे आयोजन करण्याची मागणी होत होती. “अख्खा महाराष्ट्र तुम्ही एकत्र आणला आहे” अशा प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत असल्याने अखेर या उपक्रमांचे नियोजन निश्चित झाले आहे.
दिवाळीच्या आसपास पाचगणी, महाबळेश्वर किंवा सातारा येथील एका हॉलमध्ये हा गेट-टुगेदर रंगणार आहे. सोशल मीडियावर एकत्रित असलेल्या पत्रकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना समक्ष भेटण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमांस सातारा जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी – पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. संगीता इनकर मॅडम यांचेही मोलाचे योगदान राहणार आहे.
रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या माध्यमांतून पत्रकार व अधिकारी वर्गात ऐक्यभावना निर्माण व्हावी आणि थेट संवाद साधण्याची संधी मिळावी हा या गेट-टुगेदरचा उद्देश आहे, असे पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी सांगितले.
✍️ पुण्यभूमी संपादक – मा. मंगेश पवार पुणेकर संपादक मा. महंमद शेख सांगलीकर संपादक मा.संतोष लांडे पुणेकर संपादक मा. चंद्रशेखर केंगारे लातूरकर
🖋️ पुण्यभूमी उपसंपादक मा. संभाजी पुरीगोसावी सातारकर सौ. संगीता इनकर मॅडम सौ.कलावती गवळी मॅडम कोरेगांवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. योगिता नारखेडे
