अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खासदार अमोल कोल्हे यांनी संसदीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत केली महत्वाची चर्चा
संपादक संतोष लांडे
आज संसदेत माननीय श्री. नितीनजी गडकरी Nitin Gadkari साहेबांची भेट घेऊन चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली. पुणे- नाशिक महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची, तसेच तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्ता MSIDC कडून NHAI कडे घेण्याचीही यावेळी विनंती केली.
आनंदाची बाब म्हणजे पुणे-नाशिक महामार्गाच्या कामातील अडथळे आता दूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल असे आश्वासन गडकरी साहेबांनी दिले. तसेच, तळेगाव- चाकण-शिक्रापूर प्रकल्पावर बारकाईने लक्ष असल्याचेही सांगितले. लवकरात लवकर चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी राज्य सरकारनेही Comprehensive Mobility Plan अंतर्गत पर्यायी रस्ते व MRIDC च्या माध्यमातून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देणे आवश्यक आहे.
#Devendra Fadnavis #Ajit Pawar #Eknath Shinde # एकनाथ संभाजी शिंदे
