अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश
झाराप रेल्वे स्टेशनला एकूण १२ गाडयांना थाम्बा देण्यात आला आहे.
प्रतिनिधी:- दौलत सरवणकर. ठिकाण :- झाराप, सिंधुदुर्ग.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभवजीं नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र कल्याण चे उपजिल्हाप्रमुख विजय देसाई आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून झाराप रेल्वे स्टेशनला एकूण १२ गाडयांना थाम्बा देण्यात आला आहे त्याच्या जवळपास १७४ फेऱ्या गणेश चतुर्थी दरम्यान होतील आणि ह्या १७४ फेऱ्या झाराप ला थांबतील
1) ०११५१/२ सीएसएमटि- सावंतवाडी (रोज) एकूण ४०फेऱ्या
२२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर
सीएसएमटि वरुन मध्यरात्री १२.२० ला गाडी सुटेल ती झाराप ला दुपारी २.०० वाजता पोचेल
२) ०११०३/४ सीएसएमटि- सावंतवाडी (रोज) एकूण ३६ फेऱ्या
२२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर
सीएसएमटि वरुन दुपारी ०३.३० ला गाडी सुटेल ती झाराप ला पहाटे ४.०० वाजता पोचेल.
३) ०११६७/८ एलटिटि- सावंतवाडी (रोज) एकूण ३६ फेऱ्या
२२ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर
एलटिटि वरुन रात्री ०९.०० ला गाडी सुटेल ती झाराप ला सकाळी ०९.२० वाजता पोचेल.
४) ०११७१/२ एलटिटि- सावंतवाडी (रोज) एकूण ४०फेऱ्या
२२ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर
एलटिटि वरुन सकाळी ०८.२० ला गाडी सुटेल ती झाराप ला रात्री ९.०० वाजता पोचेल.
५) ०११२९/३० एलटीटि- सावंतवाडी (दर मंगळवारी) एकूण ०६ फेऱ्या
२६ ऑगस्ट,२ सप्टेंबर,०९ सप्टेंबर
एलटिटि वरुन सकाळी ०८.४५ ला गाडी सुटेल ती झाराप ला रात्री १०.२० वाजता पोचेल
यामुळे माणगाव खोऱ्यासह वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ तालुक्यातील चाकर मान्यांना यांचा मोठा फायदा होईल याबाबत चाकरमान्यानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आभार मानले अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी माहिती दिली.
