अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
नायगाव येथे शिवसेना (उबाठा) पक्षाची शाखा स्थापन…
जिल्हाप्रमुख महेश नळगे व तालुकाप्रमुख प्रदिप बोराडे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी घेतली हाती मशाल !
जालना मंठा प्रतिनिधी:-नामदेव मंडपे
नायगाव ता.मंठा येथे शिवसेनेचे (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख महेश नळगे व तालुकाप्रमुख प्रदिप बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेची मशाल हाती घेत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.महेश नळगे जिल्हाप्रमुख व प्रदिप बोराडे तालुकाप्रमुख झाल्यानंतर परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाला रोखठोक असे युवा नेतृत्व लाभले असल्याचे मतदार संघातील प्रत्येक मतदार बोलत आहेत.
मतदार संघातील सामान्य नागरिक आपली अडचण घेऊन जिल्हाप्रमुख श्री नळगे व तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे यांच्या कडे गेल्यावर तत्काळ त्यांच्यासाठी झटणारे नेतृत्व पहावयास मिळत आहे.त्यांच्या परखड व रोखठोक भूमिकेमुळे विधानसभा मतदारसंघातून आजी माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करित असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
नायगाव येथील शाखा स्थापनेच्या वेळी तालुका संघटक ज्ञानेश्वर सरकटे,उपतालुकाप्रमुख संजय नागरे,उपतालुकाप्रमुख देवीदास खरात,अशोक खंदारे, गोरख चव्हाण,सचिन चव्हाण, विजय वाघमारे, निलेश बोराडे,आदिराज बोराडे नायगाव शाखाप्रमुख रवींद्र राठोड,राजू जुमडे,शरद वाव्हळे, राजेश आढे, शिवकुमार देशमुख,सचिव मारुती,खंदारे ऋषी,दराडे, भारत राठोड,अविनाश राठोड,महेश राठोड,कृष्णा घोगरे,कृष्णा फुफाटे,प्रदीप वाव्हळे, जय सुतार,अमोल राठोड, संदीप चव्हाण,लक्ष्मण फुफाटे, बाळू चिफडे, अनिल दहिजे,सचिन राठोड,प्रसाद वाव्हळे,विक्रम राठोड,योगेश उपाटे,कांताराम पवार,सतीश प्रधान, लक्ष्मण कोकाटे,प्रतीक सुतार,आकाश प्रधान, राजकुमार राठोड,रामेश्वर राठोड, रवींद्र आढे,राहुल चव्हाण,महादेव चव्हाण,गजानन फुपाटे,रामेश्वर फुपाटे, मारुती फुपाटे,नितीन राठोड, अमोल आढे,रवी चव्हाण,अनिल राठोड,नितीन राठोड,रवि राठोड,रंजीत राठोड,संदीप राठोड,जानकीराम राठोड, गोपाळ राठोड, संजय चव्हाण, समाधान राठोड, पृथ्वीराज चव्हाण,संतोष मिरासे यांची उपस्थिती होती.
