अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शनिवारी डॉ. अभय बंग यांच्या व्याख्यानाचे सेलूत आयोजन.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला
सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाले अंतर्गत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ. अभय बंग यांच्या व्याख्यानाचे शनिवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आयोजन करण्यात आले आहे. “वेगळे शिक्षण शक्य आहे का ?” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया हे असतील. तर ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालचे हे सुवर्ण महोत्सवी पुष्प आहे. श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, व्याख्यान
माला संयोजक कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसंयोजक प्रा.सुभाष बिरादार यांनी केले आहे.
