अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महावितरण कार्यालयात सद्भावना दिवस प्रतिज्ञा
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि २० ऑगस्ट २०२५:- भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा दिली.
महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गाने सोडविण्याची प्रतिज्ञा मुख्य अभियंता यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री मंगेश वैद्य व संजय वाकडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुला राऊत, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फ़ोटो ओळ – सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
