अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे पर्वती पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुस्क्या
पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर
संपादक संतोष लांडे
रात्रीचे वेळी घरफोडी करुन जाग्वार कंपनीचे प्लबींनगचे साहित्य चोरी करणा-या आरोपीस केले जेरबंद
दि.१०/०८/२०२५ रोजी रात्रीचे वेळी पर्वती पोलीस स्टेशन हद्दितील भाग्यलक्ष्मी हॉर्डवेअर, प्लॉट नं. ५, मित्र मंडळ कॉलनी पर्वती दर्शन पुणे ०९ येथील दुकानामध्ये प्रवेश करुन अज्ञात इरामाने महागडे जाग्वार कंपनीचे प्लबींग साहित्य, इन्व्हटर बॅटरी व रोख रक्कम असा एकुण १,०७,६००/-रु.किं.चा मुद्देमाल घरफोडी करुन चोरी गेला होता. सदर बाबत फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशन चे तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक, श्री. किरण पवार हे करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीन्वये सदरचा गुन्हा हा अक्षय शंकर कांबळे वय २५ वर्षे, रा. मिरेकर वस्ती, वैदुवाडी हडपसर पुणे याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास शिताफिने हडपसर भागातून पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण ९२,८००/- रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, अमोल दबडे, अमित चिन्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे व मनोज बनसोड यांनी केली.
