अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे समर्थ पोलिसांची धमाकेदार कामगिरी
समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर
संपादक संतोष लांडे
गहाळ झालेले व सायबर गुन्हयातील चोरी गेलेले ८,००,०००/-रु.कि.चे १२ मोबाईल फोन केले हस्तगत
केंद्र शासनाच्या सी.ई. आय. आर (CEIR) प्रणालीचा वापर करुन समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री. चेतन मोरे व पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे, सुनिता खोमणे यांनी समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहरच्या हद्दीत हरवलेल्या तसेच सायबर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईल संबंधीत डेटा तयार करुन त्याबाबत तांत्रिक तपास करुन त्यांचा वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार हरविलेले तसेच गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्हयात व तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निर्देशनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबंधित पोलीस ठाण्यास पत्रव्यवहार करुन व संवाद साधुन हरविलेले तसेच गुन्हयातील चोरीस गेलेले एकुण ८,००,०००/- रु. किंमतीचे १२ मोबाईल फोन (०६ अॅपल कंपनीचे आय फोन व ०६ इतर कंपनीचे मोबाईल फोन) हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
सदरचे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधितांना मा. पोलीस उप-आयुक्त, परी.०१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले यांचे हस्ते परत करण्यात आले.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परी ०१ श्री. कृषिकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक गुन्हे, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. चेतन भोरे यांचे सुचनेप्रमाणे समर्थ पोलीस स्टेशनकडील सायबर पोलीस पथकाचे पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे, सुनिता खोमणे व अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.
