अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर मध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
शिबीरात ७१ रूग्णांची नाडी तपासणी करण्यात आली.
सेलू : दि.१८ सोमवार रोजी शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर व मारोती नगर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ,श्री क्षेत्रत्र्यंबकेश्वर,जि,
नाशिक सद्गुरू प.पू.मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व नाडी परिक्षण तसेच सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी डाॅ. दिलीपकुमार पाटील, डाॅ.नानासाहेब शेवाळे डाॅ.सुकंन्या भाबट , कार्तिक दळवे, नागेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, संजय गव्हाडे, पांडुरंग आवचार, शैलेश बारसकर, रत्नप्रभा मगर, अंजली रोडगे, सिंधू वानखेडे आदी उपस्थित होते. शिबिराची सुरूवात श्री स्वामी समर्थ महाराज व धन्वंतरी पुजनाने आणि दीपप्रज्वलन करून डाॅ शेवाळे व डाॅ पाटील यांनी उदघाटन केले असुन या शिबिरात सांधेविकार, पक्षाघात, गुडघेदुखी, मनक्यांचे विकार, कफ,वात पित्त,मुळव्याध, अशा विविध रोगांवर तपासनी करण्या त आली संपूर्ण परभणी जिल्ह्य़ा त तालूका ठिकाणी दि १४ ते दि २१ पर्यंत ८ ठिकाणी शिबीर आयोजन करण्यात आले असुन वेगवेगळ्या आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर तमखाने, अमोल बारसकर, शंकर गात, पांडुरंग आवचार, सुमित शर्मा, उध्दव झिंजान, अनंत तेलभरे, आदिनी सहकार्य केले.
