अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नवीन धमाकेदार गाणं पाचवा घेर प्रेक्षकांच्या भेटीला
प्रतिनिधी- सारंग महाजन.
संगीतविश्वात प्रेक्षकांसाठी आणखी एक धमाल गाणं सादर झालं आहे. Sanidhapa Originals प्रस्तुत “पाचवा घेर” हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
या गाण्याचं दिग्दर्शन मनिष सुरेश शिंदे यांनी केलं असून निर्मितीची धुरा योगिता इंगळे यांनी सांभाळली आहे. गाण्याला आपला सुरेल आवाज दिला आहे बुलढाण्यातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व लोकप्रिय गायक डॉ. विवेक इंगळे आणि शितल गदरे यांनी.
गाण्याचे Executive Producers म्हणून अभिषेक शिंदे आणि मयुर परमार यांनी योगदान दिले आहे.
गाण्याचं मोहक नृत्यदिग्दर्शन अविनाश प्रकाश नलावडे यांचं असून, आकर्षक संगीत दिग्दर्शन प्रज्वल यादव यांचं आहे. याशिवाय गाण्याचं देखणं कलादिग्दर्शन अरूण पानिभाते यांनी केलं आहे तर प्रभावी छायांकनाची जबाबदारी के. विजय यांनी पार पाडली आहे.
या गाण्यात झळकले आहेत देखणे कलाकार –
ज्योत्स्ना सपकाळ,कृष्णा मूर्ती आणि सर्वांचे लाडके गायक डॉ.विवेक इंगळे
चमचमता सेट, जोशपूर्ण नृत्य आणि खास मराठमोळी झलक यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंका नाही.
सध्या हे गाणं YouTube वरील SANIDHAPA ORIGINALS या अधिकृत चॅनेलवर उपलब्ध आहे.
