अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघात सामील असलेल्या सर्वांचे कल्याण अभय गोपालदास प्रभूजी
हिंगोली श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघात सामील होऊन कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए सी भक्तिवेदांत प्रभूपाद स्वामींची शिकवण अंगीकारल्यास मानवी जीवनाचे सार्थक होऊन विश्वकल्याणाचे सेवा कार्य ही घडते अशा आशयाचे उदगार श्री कृष्ण जन्माष्टमी महामोत्सवात अभय गोपालदास प्रभुजी ह्यांनी काढले.हिंगोली इस्कॉन शाखेच्या वतीने महामहोत्सवाचे आयोजन हिंगोलीच्या श्रीनगर मधील अथर्व लॉन येथे करण्यात आले तेंव्हा आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते. श्रीमद् भगवद्गीता हे वैदिक ज्ञानामृत असून विश्व कल्याणाचा हा मूलमंत्र अंगिकारल्यास सर्वे भवंतू सुखीन: संकल्पना साकारल्या जाईल त्यामुळे हे ज्ञांनामृत सर्वांनी प्राशन करून इस्कॉन तत्व प्रणाली अंगीकारणे ही काळाची गरज आहे,असेही इस्कॉन चा देश विदेशात प्रचार प्रसार करणारे राधा गोपीनाथ मंदिर मुंबई चे प्रचारक अभय गोपालदास प्रभुजी म्हणाले. इस्कॉन च्या हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने प्रत्येक महिन्यात दोनदा भागवत कथा व वर्षभरात विविध पर्वकाळ वर सर्वार्थाने कल्याणकारी उपक्रम राबवले जातात त्याबद्दल ह्या सर्व भक्तभाविंकाचे व त्यांना सहयोग देणाऱ्या पुण्यात्मांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असेही ते म्हणाले.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नामसंकीर्तन,महाभिषेक,श्री कृष्ण जन्मोत्सव सोहळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,बालकांच्या विविध वेशभूषा आणि झांकी ,महाआरती,छप्पन भोग,आणि महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात आले होते. इस्कॉन च्या माध्यमातून प्रचार प्रसार करताना अनेकजण समर्पित होत असल्याचं पाहून आपली भारतीय संस्कृती व अध्यात्म हे जगातील सर्वश्रेष्ठ असल्याची अनुभूती होते भारतीयांचा हा अनमोल ठेवा जतन करताना विश्र्वकल्याण व विश्वबंधुत्वा ची संकल्पना साकारल्या जाते अशी ग्वाही त्यांनी दिली.हिंगोली इस्कॉन शाखेच्या माध्यामातून अल्पावधीतच वातावरण भक्तिमय झाल्याने भगवंत भक्तित हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर व अन्य गणमान्य उपस्थित होते तसेच बालगोपाल,महिला,पुरुष, ज्येष्ठ नागरिक युवक युवतींनी हिंगोली शहरातील पत्रकारांचा मोठा समावेश श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात समर्पित भावनेने सहभाग घेतल्या बद्दल त्यांनी कौतुक केलं. उद्धारासाठी इस्कॉन आणि श्रीमद् भगवदगीता प्रचार आणि प्रसार जगातील 120 भाषेतून श्रीमद् भगवदगीता उपलब्ध असल्याने विश्र्वकल्यानाचे जोमाने सुरू आहे त्यात हिंगोली जिल्हाचे वातावरण उत्साही झाल्याने इस्कॉन च सुंदर मंदिर भक्त भाविकांच्या लोक सहभागातून उभारण्यासाठी हिंगोली इस्कॉन परीवार प्रयत्नशील आहे, काही दानशूर मंडळी ह्या कार्यात सहयोग देणार असल्याचं कळल्याने आनंद झाल्याच त्यांनी म्हटलं. श्री कृष्ण जन्मकथेतून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी इस्कॉन भक्तां कडून आयोजना च्या बाबत माहिती देवून वातावरण भक्तिमय करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून कलावंतां नी विविध कलागुणांचे सादरीकरण केलं सर्व स्पर्धक आणि विजेत्यांना प्रमाण पत्र देवून सन्मानित करण्यात आले. सदरील कार्यक्रम संपन्न करण्यात इस्कॉन हिंगोली जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य भक्तगण व सहयोग देणाऱ्या सर्वांचे इस्कॉन हिंगोली शाखे ने ऋण व्यक्त व्यक्त केल.विविध जाती धर्मातील अबाल वृध्द आणि युवक युवतींनी सहभागी होवून अध्यात्मिक सांस्कृतिक आदी उपक्रमां चा लाभ घेतला.
