अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे वाघोली पोलिसांनी छापा टाकून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
अंगली पदार्थ विरोधी पथक ०२ व युनिट ०६, गुन्हे शाखा, पुणे शहर वाघोली भागात छापा कारवाई करुन ७६,०१,७१०/-रु. किं. चा मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त
दि.१५/०८/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत तांबे वस्ती, गुलमोहर पार्कचे मागे बकोरी, वाघोली पुणे येथे सार्वजनीक ठिकाणी आरोपी नामे १) रामेश्वरलाल मोतीजी आहिर, वय ४५ वर्षे, रा. अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान २) नक्षत्र हेमराज अहिर, वय २५ वर्षे रा. अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान यांच्या ताब्यात एकुण ७६,०१,७१०/-रू. कि. चा ऐवज त्यामध्ये ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करुन त्यांचे विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२०/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरी. नितीनकुमार नाईक, सहा. पोलीस निरी. राकेश कदम, सहा. पोलीस निरी. मदन कांबळे व पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, प्रशांत बोमांदंडी, संदिप शेळके, संदिप जाधव, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड, सारंग दळे, प्रशांत कापुरे, गिरीश नाणेकर, सचिन पवार, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.
