एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ड्रोनचा वापर करुन हातभट्टी दारू तयार करणा-या अड्ड्यांवर, तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणा-या आरोपींच्या आवळल्या मुसक्या

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

ड्रोनचा वापर करुन हातभट्टी दारू तयार करणा-या अड्ड्यांवर, तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणा-या आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव 

परिमंडळ ४, पुणे शहर

ड्रोनचा वापर करुन हातभट्टी दारू तयार करणा-या अड्ड्यांवर, तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणा-या आरोपींवर कारवाई करुन ३६,७३५/-रु. किं.चा मुद्देमाल केला जप्त

पोलीस आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष गोहीग राबवून अवैधपणे सुरु असणा-या धंद्यावर कठोर कारवाई करुन समूळ उच्चाटन करण्याचे आदेश मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ श्री. सोमय गुंडे यांनी दिले आहेत.

दि.१६/०८/२०२५ रोजी पहाटे पासुन मासरेड चे आयोजन करून पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ हद्दीमध्ये लपून-छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या एकुण १६ लोकांवर कारवाई करुन १६ गुन्हे दाखल करून ३६,७३५/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ३१,६३०/- रु. किं.ची ३१८ लि. गावठी हातभट्टी तयार दारु व २,९६०/- रु. कि.ची ६.६०० लिटर देशी दारु जप्त करण्यात आली आहे.

अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी २३ पोलीस अधिकारी, ६८ पोलीस अमलदारांची व ०१ एम.एस.व्ही. व्हॅन व ड्रोनचा वापर करुन वरील विशेष पथकाद्वारे सदरची गोहीम राबविण्यात आली. सदर गासरेड मध्ये पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ४ हद्दीतील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील डोंगराळ भागात आणि नदी परिसरात लपून-छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणा-यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.४ श्री. सोमय गुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्री. विठ्ठल दबडे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे परिमंडळ ४ हद्दीतील पोलीस स्टेशनकडून अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link