अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
माहीम शाळा बचाव आंदोलनास नागरिकांचा मोठा प्रतिसाद
जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहन जोशी यांच्या शुभहस्ते आज माहीमच्या भागोजी कीर मार्गावरील अॅड. देसाई मैदानात एम एम सी मार्गाजवळील महापालिका शाळा व माहीम मधील क्रिडांगण उद्यान इस्पितळांचे भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन झाले.
यावेळी अनेकांनी आपली मत व्यक्त केली. माहीमचे नागरिक, त्या शाळेचे माजी विद्यार्थी संघ, आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, सामाजिक कार्यकर्ते आजी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सर्वोदयचे जयंत दिवाण – मुंबईतील आरक्षित जागा गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. शहर बकाल होत आहे असे मत व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते इरफान मच्छीवाला – माहीम मधे अनेक समस्या दूर करण्यासाठी चांगल्या माणसांनी पुढे यावे. जनतेच्या न्याय-हितासाठी आमचा पाठिंबा राहील, असे ते म्हणाले.
सारेगमपचे सुधीर पेडणेकर – आपण नेहमीच सत्याला धरून राहीले पाहीजे, सत्य आपल्या सोबत राहील असे सांगितले.
माजी विद्यार्थी संघाचे सतीश परब – मुंबईला आंदोलनाचा इतिहास आहे, त्यामुळे यापुढेही असे लढे होत राहतील, आणि आमची शाळा वाचवण्यासाठी हा लढा सुरू ठेवू, त्यांनी शालेय आठवणींना उजाळा देऊन आपले विचार मांडले.
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फातर्पेकर – विकास म्हणुन आणलेले प्रकल्प आणि मुंबईतील भूखंड विकसित करणे हा हेतूतःजमिनी बळकावण्याचा प्रयत्न आहे.
सरस्वती विद्यामंदिरचे ट्रस्टी प्रो. आत्माराम साखरदांडे – सत्य आणि न्यायासाठी सर्वानीच सक्रीय असावे असे म्हणाले.
अॅड. योगिता सावंत – सर्वांनी एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कांसाठी एकजुटीने लढले पाहीजे, आम्ही लढत राहू असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्यां, आप मुंबई प्रदेश कमिटीच्या प्रणाली राऊत – “शाळा ही एक संस्कृती आहे, शाळा देशाचे भविष्य आहे. शाळा बंद झाल्या तर देश धोक्यात येईल.” माहीमचे शाळा, इस्पितळे, क्रीडांगणे, उद्यानांसाठी आरक्षित भूखंड गमावणे म्हणजे “प्राईम लॅन्ड माहीमचे क्राइम लॅन्ड माहीम करणे”. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शाळा, उद्याने, क्रीडांगणं महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ती पिढ्यानपिढ्यांची ठेव आहे आणि ते राखण्याचे पवित्र काम सर्वानी करावे.
माहीम शाळेला खोटे c1 चे सर्टिफिकेट देऊन शाळा पडण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतीव नुकसान होत आहे. यासाठी आम्ही सगळ्या पातळीवर काम करून शाळा वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू.
युरोप अमेरिका सारख्या देशातील शहरांचे आपण कौतुक करतो कारण तेथील सरकार, प्रशासन आणि नागरिक नियोजन मोडत नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले.
सोबत ग्रंथाली वाचविण्यासाठी सतत लढा देणारे ॲड आनंद माने आणि सुधीर हेगिष्टे ,, सामाजिक कार्यकर्ते गुलजार राणा उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मधे झालेल्या ढग फुटीत आज 48 लोक मृत्युमुखी पडले, गुजरात विमान अपघातात, पहलगाम च्या अतिरेकी हल्ल्यात बळी ठरलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली आणि स्मृति राऊत हिने पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता केली आणि सर्वांचे आभार व्यक्त केले.
