अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या
वतीने आयोजित केलेल्या निर्धार पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या निर्धार परिषदेला पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांन संबोधित केले. ज्या भाजपचं देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नाही, ती इथली व्यवस्था बिघडवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगतं निशाणा साधला. ह्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
