अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महसूल विभागाच्या सेवेत अधिक सुलभतेसाठी मान्यवरांच्या विचारांचा आदर करुन व्हिजन डॉक्युमेंट साकारु
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर,दि. 14 : विकसीत महाराष्ट्र 2047 चे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशासनातर्फे परिपूर्ण व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जात आहे. भुसंपादन क्षेत्रांतर्गत महूसल विभागासाठी जो मसूदा तयार केला जात आहे त्यात समाजातील विविध घटकांशी चर्चा करुन त्यांचे अभिप्राय घेतले जात आहेत. तीन टप्प्यांसाठी हे उद्दिष्ट निश्चित केले जात असून यात दीर्घकालीन (महाराष्ट्र @ 2047), मध्यकालीन ( दिनांक 1 मे 2035 ) व अल्पकालीन ( पंचवार्षिक योजना ) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लवकरच विविध संस्था व समाजातील मान्यवर व्यक्तींच्या सहभागातून हा व्हिजन आराखडा साकारु, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिजन डॉक्युमेंट संदर्भात आयोजित या बैठकीत वरिष्ठ अधिकारी व विविध संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. जनतेच्या अधिकाधिक सुविधेच्या दृष्टीने महसूल विभागाचे हे डॉक्युमेंट साकारण्यासाठी विविध घटकांचा आपण सामावेश घेतला आहे. समाजातील विविध मान्यवरांची आपण चर्चा करुन त्यांची मतांतरे जाणून घेत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
सेतू सुविधा केंद्रातून सेवा घेणारे अभ्यागत, खनिकर्म संस्था, महसूल विभाग, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आदी मान्यवरांच्या सूचना विचारात घेवून कार्यवाही करु, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत विविध मान्यवरांनी दिलेल्या मौलिक सूचना नोंदवून घेतल्या.
