अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना साउथ इंडियन विभाग सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
डोंबिवली व श्री मूकाम्बिका सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित कार्यकर्ता समावेश व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला
दिनांक १२ऑगस्ट 2025 रोजी सायं. 4 ते 9 या वेळेत डोंबिवली पूर्व येथील लेवा भवन, दत्तनगर येथे शिवसेना साउथ इंडियन विभाग व श्री मूकाम्बिका सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता समावेश सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण ग्रामीणचे आमदार मा. श्री. राजेश गोवर्धन मोरे व शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. लताताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
साउथ इंडियन समाजाचा सामाजिक सहभाग आणि शिवसेनेत योगदान अधिक भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली.
साउथ इंडियन समाज यांची एकजूट कार्यक्रमातून दिसून आली.
