अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून अचानक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस..!!
आरती पाटील ( मुंबई ) प्रतिनिधी
गेल्या नऊ महिन्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचे चांगलेच पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून प्रशासनात चांगलाच बदल पाहायला मिळाला आहे. यामध्ये आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा चांगलाच धडाका लावला आहे. यामध्ये मंगळवारी राज्य सरकारने सात वरिष्ठ ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला असून यामध्ये भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांचाही समावेश आहे. त्यांची बदली शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे विस्थापकी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नंदुरबारचे सीईओ सावन कुमार यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका पाहायला मिळत आहे. अचानक बदल्यांमुळे प्रशासकीय विभागात देखील खळबळ उडाली आहे.
