अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पी.एम.श्री, जि.प.शाळेचे तालूकास्तरीय स्पर्धेत यश
मानवत / प्रतिनिधी
————————
मानवत येथील पी.एम.श्री, (𝐏𝐌-𝐒𝐇𝐑𝐈 ) जि. प. कें. प्रा. शा. मानवत, शाळेचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत नेत्रदीपक यश, 3 विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले
मानवत शहरातील, शिस्त, गुणवत्ता, वृक्षसंवर्धन, यासोबतच मागील काही वर्षात, विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या,
पीएम श्री, (PM-SHRI ) जि. प. कें. प्रा. शा. मानवत शाळेचे, Under 14 गटामधून
मन्मथ श्रीराम पकवाने, नयन कैलास शिंदे, प्रज्वल दत्तात्रय भालेराव या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, वरील विद्यार्थी कॅरम स्पर्धेसाठी मानवत तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील.
क्रीडा शिक्षक, गुलाबराव लाड सर, दत्ता ठोंबरे सर, व परमेश्वर बोडखे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली, तयार झालेल्या खेळाडूंचे, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण, केंद्रप्रमुख हाडुळे उमाकांत,शाळा व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष मोहनभाऊ लाड, विद्यमान अध्यक्ष राणीताई गोलाईत,उपाध्यक्ष विलास बारहाते,मुख्याध्यापक माणिक घाटुळ सर,तालुका संयोजक किशन भिसे सर व सर्व smc सदस्य यांनी,अभिनंदन करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
