अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींच्या वाघोली पोलीसांनी आवळल्या मुसक्या…!!
2 दुचाकीसह 3 मोबाईल असा एकूण 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत..!!
कलावती गवळी पुणे जिल्हा प्रतिनिधी
वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकांची उल्लेखनीय कामगिरी करीत जबरी चोरी करणारे दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन दुचाकीसह तीन मोबाईल असा एकूण १,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून दि.०३/०८/२०२५ रोजी फिर्यादी दिपक शहादेव कोटुळे हे रात्री ११/१५ वा. दरम्यान सावली हॉटेलच्या समोर आव्हाळवाडी खराडी रोडवरून जात असताना एका काळ्या रंगाची दुचाकी वरून आलेले दोन अनोळखी इसमांनी येवून कट का मारला तुला मारून टाकतो असे म्हणून फिर्यादीस मारहाण करून त्यांचा मोबाईल दुचाकी गाडी जबरदस्तीने घेवून त्यांना गाडीवर बसवून घेवून जावून विगाननगर येथे सोडले म्हणून तक्रार दिलेवरून गु.र.नं. ३९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ११५(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास चालू असताना पोहवा/१५०३ बाबासाहेब मोराळे, पोशि/१०५९४ पांडुरंग माने, पोशि/१०५८० समीर भोरडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून आरोपी तुषार गोरख चांदणे (वय २०) धंदा केक शॉप येथे रा बापू आव्हाळे यांचेकडे भाड्याने, आव्हाळवाडी, ता. हवेली जि. पुणे मुळ परडीवाडी ता. वडवणी जि. बीड २) नितिन रमेश कुसळे, (वय २१ ) धंदा जेसीबी चालक, रा. सागर आव्हाळे यांचेकडे भाडयाने, आप्पा चौक, आव्हाळवाडी, ता.हवेली, जि.पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदचा गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. यामध्ये दोन आरोपींना अटक करून त्यांचेकडून दोन दुचाकीसह तीन मोबाईल असे एकूण १,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिध्दनाथ शेंडगे करीत आहेत.
सदरची कामगिरी अमितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील साो.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. सोमय मुंडे साो, पोलीस उप आयुक्त सो,परीमंडळ ४, पुणे शहर, मा प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे आसाराम शेटे पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलीस स्टेशन, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, प्रमोद नवले, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
