अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
युवानेते शिरीष भाऊ गोरठेकर यांच्या तत्परतेने अपघातातील चौघांना मिळाले जीवदान…
प्रतिनिधी गजानन वाघमारे
धर्माबाद कारेगाव मार्गांवर चिकना पाटीजवळ कार पलटी खाऊन दरीत कोसळली ही घटना या रस्त्याने येत असलेले पत्रकार तथा गोरठेकर परिवाराचे कट्टर समर्थक सतीश पाटील शिंदे यांच्या समोर घडली.
योगायोग याच रस्त्याने युवानेते शिरीष भाऊ गोरठेकर आपल्या सहकार्यासह धर्माबाद कडे येत होते.सतिष शिंदे यांनी शिरीष भाऊ गोरठेकर यांना हा प्रकार कळवताच क्षणाचाही विलंब न करता स्वतः शिरीष भाऊ आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन दरीत कोसळलेल्या कार मधील दोन बालके आणि त्यांचे आई वडिलांना सुरक्षित बाहेर काढून स्वतःच्या गाडीत धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पूर्ण उपचार होईपर्यंत तेथे थांबले जखमींची प्रकृती सुधारणा होई पर्यंत शिरीष भाऊ रुग्णालयात बसून होते.
या मतदार संघात गोरठेकर परिवाराची तिसरी पिढी राजकीय पटलावर सक्रिय आहे.
शिरीष भाऊ गोरठेकर साहेब यांच्या
या कृतीतून त्यांचे सामाजिक योगदान जनतेप्रती आपुलकी आणि सामाजिक उत्तरदायित्व स्पष्टपने दिसून आले.
या घटनेची दखल घेतल्यामुळे सर्व जनतेतून पत्रकार तथा गोरठेकर परिवाराचे खांदे समर्थक सतीश भाऊ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गोरठेकर परिवार हे सर्व सामान्य कुटुंबाचे दख्खल घेणारे कुटुंब आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे.
