सुगरणीचा खोपा दुर्मिळ होतो आहे शहरीकरन आणि पर्यावरणीय बदल प्रमुख कारणे
परभणी प्रतिनिधी गजानन देशमुख
वांगी रोड लगत डबडबलेल्या विहरीवरील कडूलिंबाच्या झाडाला लटकलेली घरटी बघितल्यावर श्रावणात पहिल्याच दिवशी
बहिणाबाईं चौधरी यांच्या ओळी आठवल्या “खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा खोपा तिने पिलांना बांधला .” असं प्रसिद्ध गाणं आहे. आज वाढत्या परभणी शहरांमध्ये मोठ मोठ्या वस्त्या चौहू बाजुंनी वाढत आहेत. गाववाड्याच्या सीमा शहराला विस्तारलेल्या आहेत.पुर्वी सुगरण पक्षी आपला खोपा विहिरीलगत किंवा काटेरी बाभळी यासारख्या झाडावर बांधत होता. तसेच उसाच्या भात शेतीच्या जवळ घरटी करतात. बाजरी ,नाचणी, हे भरड धान्य सध्या लागवड कमी अशा बदलेल्या पिक पध्दती मुळं पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. तसेच वाढत्या किटकनाशकांच्या वापरामुळे आणि तणनाशकामुळे सुगरणीला लागणारे गवत कमी झाली आहे. माणसांनी आपला आदिवास शेतशिवाराकडे वळविल्यानंतर पक्ष समोरच प्रश्न उभा राहिला आपली घरटी कुठे उभारावी. अशा परिस्थितीत सुगरणीची घरटे आपल्याला मे ते सप्टेंबर दरम्यान दिसतात. ते आता कडुलिंब विहरीलगत बनवितांना किंवा नारळी झाडांना खोपी लटकलेली कमी प्रमाणात दिसत आहेत. सुगरण पक्षी हा प्रामुख्याने पिकावरील किटक आपले खाद्य बनवत असतो. पर्यावरण प्रेमी पशु-पक्षी मित्रांनी या सुगरण पक्षाच्या घरट्यांचे वाढीसाठी आणि पर्यावरणीय निसर्गसंपदा जोपासण्यासाठी जाणीव जागृती करणे आवश्यक आहे.
