एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जि.प. पं.स. ग्रा.पं. निवडणूक आढावा बैठक संपन्न 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

जि.प. पं.स. ग्रा.पं. निवडणूक आढावा बैठक संपन्न

भारज प्रतिनिधी राजेश दामधर

 

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कोहिनूर लॉन्स जाफ्राबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असून पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जनाधार वाढवण्याचा निर्धार केला. आदरणीय पवार साहेबांचा विचार व पक्षाच्या माध्यमातून झालेले लोकहिताचे कामे तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे तसेच पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नक्कीच न्याय दिला जाईल, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिट्या मजबूत करावे असे यावेळी मा.आ. चंद्रकांत दानवे साहेब यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आव्हान केले.
बैठकी दरम्यान देऊळझरी येथील युवा कार्यकर्ते श्री. दिनकर भोपळे यांनी भाजपा सोडून मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी तालुकाध्यक्ष रामधन पा.कळंबे, युवानेते सुधाकर आण्णा दानवे, श्री. आंबादास रगडे साहेब, नगराध्यक्षा सुरेखाताई लहाने, श्री. एकनाथ शेवत्रे सर, साबेद चाऊस, ॲड रामकृष्ण बनकर, रघुनाथ पंडीत, राजु जाधव, नितीन शिवनकर, प्रदिप मघाडे, रऊफ चेअरमन, मुजीफ सर, गजानन लोखंडे, फईमखॉ पठाण, तालेब सर, सऊदभाई, शफि शेठ, विठ्ठल गोरे, उत्तमराव ऊगले, अमोल शेळके, ज्ञानेश्वर पाबळे, गजु पा.लोखंडे, वामनराव दांडगे, एल.बी. शिंदे, बाबासाहेब जाधव, गणेश बापु चव्हाण, गजानन जाधव, के.एम.पंडीत, प्रकाश राऊत, रमेश राठोड, भगवानराव बनकर, प्रल्हाद पा.लोखंडे, भगवान गिरणारे, भाऊसाहेब गाढे, परसराम ढाले, कौतिकराव राऊत, दादाराव सरोदे, सचिन अवकाळे, योगेश सवडे, संतोष अंभोरे, शेख आसिफ, मुजफ्फर शेख, पुरुषोत्तम गाडेकर, फैजान पाशा, मुजाहिद मिर्झा, किरण सोनवणे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link