अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी गोसावी यांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती..!!
कलावती गवळी ( मुंबई ) प्रतिनिधी
राज्य पोलीस दलात तब्बल 341 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती देवुन नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांच्या आदेशात हे आदेश काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा रामदत्ता गिरीगोसावी यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आदरणीय मनीषा गिरी मॅडम यांना रोखठोक महाराष्ट्र ग्रुप, नेशन महाराष्ट्र दैनिक परिवार,अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे. आणि समस्त पुरीगोसावी परिवार दशनाम गोसावी समाज सातारा जिल्हा आणि सौ. अनुजा कारखेले-देवरे मॅडम पुणेकर यांच्याकडून शुभेच्छा आहेत. मनीषा गिरी या पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या सेवेत लातूर बीड जालना आणि सध्या नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. अशा या जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात आणि मुख्यालयात सेवा बजावली आहे. त्यांची नवीन पदस्थापना ही नागपूर शहर पोलीस दलात झाली आहे
