अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सातारच्या संभाजी पुरीगोसावी यांची स्वारगेट पोलीस ठाणेला सदिंच्छा भेट …
कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
पुणे शहरांत पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचा धमाका नेहमीच पाहायला मिळतोय. दोनच दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशावरून जवळपास 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. तर काही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या महिन्यांतच पुन्हा खांदेपालट दिसून आली. पोलीस आयुक्तांनी जवळपास 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. यामध्ये स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांची वाहतूक शाखेत बदली झाल्याने स्वारगेट पोलीस ठाण्याला सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांची स्वारगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी स्वारगेट पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यशवंत निकम यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. निकम यांनी पुणे शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यांतील आहेत. आज रोजी सातारच्या संभाजी पुरीगोसावी यांनी जयहिंद साहेब नमस्कार … असे म्हणत सदिंच्छा भेट घेवुन स्वारगेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करीत रोखठोक महाराष्ट्र परिवारांकडून शुभेच्छा दिल्या.
