हिंगोली जिल्ह्यातील जोड जवळा येथे शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी यांचा विरोध
प्रतिनिधी हिंगोली .श्रीहरी अंभोरे पाटील
जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जोड जवळा या ठिकाणी वसमत येथील उपविभागीय अधिकारी श्री विकास माने हे जोड जवळा या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गेले असता त्या ठिकाणी असलेल्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी विकास माने यांची भेट घेऊन शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध असून हा शक्तिपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही यासाठी आपण तात्काळ मोजणी थांबवावी अशा प्रकारचे निवेदनही जोड जवळा या गावातील शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी विकास माने यांना निवेदन दिले एकूणच वसमत तालुक्यातील12गावातुन शक्तिपीठ महामार्ग जात असल्याने या बारा गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदन हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते त्यानुसार वसमत या ठिकाणी मोर्चे आंदोलन व रस्ता रोको राष्ट्रीय महामार्ग रोको करून तीव्र विरोध केला यामुळे शक्तिपीठ महामार्गाला वसमत तालुक्यात नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याचा तीव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे अनेक वेळा शासन दरबारी शक्तीपीठ महामार्गा त जात असलेल्या शेतातील शेतकऱ्यांनी विरोध केला पण शासन शक्तीने शक्तिपीठ महामार्ग शक्तीने सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे तयारीत दिसून येत आहे पण तालुक्यातील वसमत येथे नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्ग रोकुन शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग होत असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध करून यापूर्वी सांगितले होते की शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत व शेतकऱ्यांच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत राहतीलच यानंतर शासनाने शक्तिपीठ महामार्गाचा कुठलाही पाऊल उचलून आमच्या भावना दुखवू नये यापूर्वी वसमत तालुक्यातील आसेगाव येथे रूज गुज या ठिकाणी सुद्धा उपविभागीय अधिकारी विकास माने यांना शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करून शेतकऱ्यांनी निवेदने त्या ठिकाणी दिले त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या शासनाने मोठी कंबर जरी कसलेली असली तरी वसमत तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांनी मात्र याला चांगलाच विरोध केल्याचे दिसून येत आहे निवेदन उपोषण रस्ता रोको करून सुद्धा शासनाला शेतकऱ्याच्या भावना कळत नसतील तर आम्ही शक्तिपीठ महामार्गाला शेवटपर्यंत विरोधच करणारच राहणार असे या ठिकाणी बोलल्या गेले येलदरी सिद्धेश्वर अशा मोठ्या डॅम मधून तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा होत असल्याने ही जमीन गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या आमच्या वाडवडीलापासून असतं असून ही जमीन आता सुपीक झाली आहे आम्ही वीस एकरचे आमचे आजोबा वडल्याच्या काळात दहा एकरवर आले आणि आज आमच्या काळात भाववाटनित आम्ही दोन तीन एकर वर आलो आहोत त्यामुळे भविष्यात आमची मुले बाळे काय करतील त्यांचा उदरनिर्वाच साधन शेती एवढेच आहे हाताला काम नाही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी शासनाने शक्तिपीठ महामार्गा काम तात्काळ थांबून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशीही मागणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांमधून लेखी निवेदनाद्वारे शासनाला कळवली आहे .
