एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मीरा-भाईंदरच्या सीपींची उचलबांगडी मराठी मोर्चाला परवानगी न देणं भोवलं, निकेत कौशिकांची पोलीस आयुक्तपदी वर्णी..!!

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

मीरा-भाईंदरच्या सीपींची उचलबांगडी मराठी मोर्चाला परवानगी न देणं भोवलं, निकेत कौशिकांची पोलीस आयुक्तपदी वर्णी

स्नेहल तांबोळी ( मीरा-वसई ) प्रतिनिधी

मीरा-भाईदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठा बदल करण्यात आला आहे. सध्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी निकेत कौशिक हे मीरा-भाईंदर वसई विरार शहरांचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या बाबत बुधवारी राज्यांच्या गृह विभागाने शासन आदेश जारी करत मीरा-भाईंदरचे विद्यमान पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या अप्पर पोलीस महासंचालक ( प्रशासन ) येथे बदली केली आहे. तर त्यांच्या जागी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेले निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 19 94 बॅचच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी निकेत कौशिक हे यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ( एसीबी ) अतिरिक्त महासंचालक ( एडीजी ) म्हणून कार्यरत होते. मूळचे हरियाणाचे असलेले आयपीएस अधिकारी निकेत कौशिक यांनी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपदे भूषवली आहेत. लवकरच मीरा भाईदर वसई विरार चे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर विद्यमान पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना मराठी मोर्चाला परवानगी न देणं भोवलं आहे. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी राज्यांच्या गृह विभागाने परिपत्रक काढले आहे. तर नवे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तात्काळ पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला असल्याची ही माहिती समोर आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link