एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आषाढी पंढरपूर पायी वारी साठी मोफत औषधे सेवा वाटप

आषाढी पंढरपूर पायी वारी साठी मोफत औषधे सेवा वाटप

प्रतिनिधी:गोपाळ भालेराव

चिंचवड:आज दिनांक 18 जुन 2025 रोजी पिंपरी -चिंचवड येथे पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम निरोगी राहावे यासाठी विश्व हिंदू परिषद अनेक वर्षांपासून पंढरपूर पर्यंत अनेक व्यवस्थेसह डॉक्टर, नर्सेस, ऍम्ब्युलन्स, स्वयंसेवक आदी टीम सह वारकऱ्यांना सर्व प्रकारची औषधी सेवा देत असते.
‘मधुकर बच्चे युवा मंच’, ‘चैतन्य फार्मा ग्रुप’ व ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ यांच्या वतीने गेली १६ वर्षे सातत्याने लोकसहभागातून मोठ्या प्रमानात औषधे दिली जातात.

या वर्षी देखील जास्तीत जास्त औषधे देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसहभागातून जमा केलेली हि सर्व औषधे विश्व हिंदू परिषेधेकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम चिंचवड केशवनगर येथील’ यशस्वी क्लासेस हॉल’ येथे पार पडला.

या प्रसंगी भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, भाजपा प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा शहर उपाध्यक्ष रवी देशपांडे, नंदू भोगले यांच्या सह प्रमुख मान्यवर उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य तथा भाजपा शहर सचिव, वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

कुंदन एजन्सी सर्वेसर्वा अजय दर्डा,मोहन कुलकर्णी,उद्योजक शंकर गावडे, वर्षा डांगे, यशस्वी क्लासेसच्या मंगला डोळे – सपकाळे, मोरया फार्माचे मारुती हाके, राजू कोरे, समाजसेवक रवींद्र सागडे, निलेश घाडगे, सागर जोशी, रम्या मास्ते आदिंनी या उपक्रमात मोठी मदत केली.
चैतन्य फार्मा ग्रुप चे पोपट बच्चे, गणेश बच्चे, अक्षय गारगोटे, रोहिणी बच्चे, अर्चना बच्चे, काजल गावडे -बच्चे, श्रावणी बच्चे, आसावरी बच्चे, वुई टुगेदर फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सचिव जयंत कुलकर्णी, सह सचिव मंगला डोळे – सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सलीम सय्यद, क्रा कडुलकर, रवींद्र सागडे, धनंजय मांडके, दिलीप पेटकर, दारासिंह मन्हास गिरीष हंपे,मच्छिन्द्र थोरवे,खुशाल दुसाने, आर्जून पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

औषधे स्वीकारण्यासाठी विश्व हिंदू परिषदचे गोविंद

 

देशपांडे,यशवंत देशपांडे,विजय देशपांडे,डॉ.शर्वरी एलगट्टिवार पांडुरंग पुजारी आदी प्रमुख पादाधिकारी यांनी औषधे स्वीकारली.
फाउंडेशन सह सचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले
सचिव जयंत कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
विश्व हिंदू परिषेदेच्या वतीने मधुकर बच्चे व सर्व सहकारी, दानशूर दाते आदींचे कौतुक करण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link