एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गांधी विचार संस्कार परीक्षेत थेपडे म्हसावद विद्यालय जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याकडून सन्मानित

गांधी विचार संस्कार परीक्षेत थेपडे म्हसावद विद्यालय जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याकडून सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

गांधी तीर्थ रिसर्च फाउंडेशन जळगावच्या वतीने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद शाळेने पटकावले. थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी .डी. चौधरी यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी महात्मा गांधीजींचे स्मृतिचिन्ह भेट देऊन सन्मानित केले. गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. स्वातंत्र्य सैनिक थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हसावद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 652 विद्यार्थी विद्यार्थिनीनी या परीक्षेत सहभागी होऊन बक्षिसे मिळवली. सदर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांनी म.गांधीजीचे सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, दयाभाव इत्यादी जीवनमूल्य रुजविणारे विचार आत्मसात केले.
गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक म्हणून श्री आर. आर. महाजन यांनी काम पाहिले. विद्यालयातील सर्व वर्गशिक्षकांनी या परीक्षेसाठी योगदान दिले.
याप्रसंगी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, डाएटचे प्राचार्य झोपे सर,माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पनाताई चव्हाण, उपशिक्षणाधिकारी रागिनीताई चव्हाण, फिरोज पठाण, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. के. पाटील, जळगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष खंबायत सर, गांधी विचार संस्कार परीक्षा जळगावचे समन्वयक श्री गिरीश कुलकर्णी, ब.ग.विश्वस्त निधी संस्थेचे चेअरमन डॉक्टर श्री केदारजी थेपडे यांनी मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक अभिनंदन केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link