अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
पुणे कात्रज सुखसागर नगर परिसरामध्ये यशश्री सोसायटी च्या समोर पायी चाललेल्या मुलीला जोरदार येणाऱ्या टुरिस्ट व्हॅगन आर कारने एम. एच. १२ यु. एम.४८४७. जोराची धडक दिली यामध्ये श्रेया गौतम येवले वय 21,शीतल हाईट्स, खंडोबा मंदिर जवळ कोंढवा पुणे या मुलीचा जागीच मृत्यू झाला.
प्रतिनिधी आदित्य चव्हाण पुणे
कार चालक हा मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून छोटे नारळाचे झाड तोडून पायी चालत येणाऱ्या मुलीस धडकला. समोर असणारे बदामाचे झाड व कार त्यामध्ये सापडून मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ,बिबेवाडी व कोंढवा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत ससून येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.तर कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने वय ३७ रा गोकुळ नगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
