एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एंजल हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब यशवंत महाडिक यांना नुकताच जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

एंजल हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब यशवंत महाडिक यांना नुकताच जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

 

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडी, टि, डी ,एफ )व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षीचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार भाऊसाहेब महाडिक यांना प्रदान करण्यात आला होता हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय मंचर या ठिकाणी संपन्न झाला. आदर्श शिक्षक भाऊसाहेब महाडिक हे एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा विभाग प्रमुख म्हणून काम पहात आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय,विभागीयस्तर व राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी करून अनेक बक्षिसे मिळविली आहे.हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे व हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव म्हणून काम पहात आहे. भाऊसाहेब यशवंत महाडिक यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक बक्षिसे मिळविली आहे.त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
पुरस्कार प्रदान प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याचे अध्यक्ष जे.के थोरात, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के.एम. ढोमसे, पंचायत समिती गटविकास अधिकारी जीवन कोकणे, शिवव्याख्याते गुलाब बाणखेले, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पंकज घोलप, पश्चिम महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते अशोक नाळे

 

,रयत शिक्षण संस्थेचे सदस्य उदय शिवाजी पाटील, राजाराम बाणखेले हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोपटे,महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य नितीन बाणखेले, अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य नानासाहेब गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव उत्तमराव आवारी, सोमनाथ भांडारे, स्नेहल बाळसराफ,यादव चासकर, तानाजी झेंडे, राजेंद्र पडवळ, ज्योती दहितुले, स्वाती उपार, आदि मान्यवर उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link