एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

“नाटक थांबतं, उंदीर सुरू होतात!” — यशवंतराव नाट्यगृहातील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेचा उंदीरदंश

प्रतिनिधी : संतोष लांडे | पुणे, कोथरूड.

पुण्याच्या सांस्कृतिक राजधानी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सध्या उंदरांमुळे चर्चेत आहे. एका महिलेच्या साडीत थेट उंदीर शिरल्याची घटना घडल्यानंतर प्रेक्षकांमध्ये भीती पसरली असून, महापालिका आणि नाट्यगृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

उंदीर आणि उरलेली फवारणी

नाट्यगृहात दररोज साफसफाई केली जात असली, तरी स्टेजखालचा भाग आणि मागील गोडाऊनमध्ये कीटकनाशक फवारणी अपुरी असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे. या भागांमध्ये उंदरांचा मुक्त संचार अद्यापही सुरूच आहे. यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञ अस्वस्थ आहेत.

सीसीटीव्ही बंद, शौचालय दुरवस्थेत

सुरक्षेच्या बाबतीत देखील नाट्यगृहाचे व्यवस्थापन अपयशी ठरले आहे. काही सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त अवस्थेत आहेत. शौचालयात अस्वच्छता, गुटखा खाल्ल्यानंतर थुंकण्याचे प्रकार, पिण्याच्या पाण्याचे झाकण तुटलेली अवस्था — हे चित्र सार्वजनिक सुविधांबाबतची बेपर्वाई स्पष्ट करते.

प्रेक्षकांचा रोष, कलाकारांचा संताप

प्रेक्षकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असून, काही नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे. युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाट्यगृह व्यवस्थापनाला पिंजरे भेट दिले असून, उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘हे इथेच का घडतं?’

एक मॅजिशियन कलाकार म्हणाले, “पुण्यातील चित्रपटगृहांत, खासगी नाट्यगृहांत अशी परिस्थिती दिसत नाही. मग महापालिकेच्या देखरेखीतील या ठिकाणीच ही दुर्दशा का?” हे प्रश्न केवळ सामान्य प्रेक्षकांचे नाहीत, तर पुण्याचे सांस्कृतिक भान राखणाऱ्या प्रत्येकाचे आहेत.

महात्मा फुले सांस्कृतिक भवनाचीही अवस्था बिकट

फक्त यशवंतराव नाट्यगृहच नव्हे, तर वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनही देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. तुटलेले दरवाजे, अस्वच्छ शौचालये, नादुरुस्त विद्युत व्यवस्था आणि अपुऱ्या सुरक्षेचा त्रास येथेही जाणवत आहे. निविदा प्रक्रिया रखडल्याने दुरुस्तीची कामे थांबली असून, काही सुरक्षारक्षक व स्वच्छता कर्मचारी या ढिसाळ व्यवस्थेला तोंड देत आहेत.

सांस्कृतिक भव्यतेला लागलेली गंज

“बाहेरून भव्य, आतून खोखले” हे नाट्यगृहांचे वर्णन सध्या पुण्यातील अनेक सांस्कृतिक केंद्रांना लागू पडते. पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांचे बजेट असले तरी, देखभाल, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे केलेले दुर्लक्ष केवळ निंदनीय नाही तर धोकादायकही आहे.

संपादकीय टिप्पणी:

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे केवळ एक इमारत नाही, तर पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि कलाकाराच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनावर आहे. उंदीर, थुंकी, आणि अस्वच्छता या व्यत्ययांमुळे “नाटकाच्या रंगमंचावर नाटक थांबतं, आणि उंदीर सुरू होतात,” ही वाईट स्थिती निर्माण झाली आहे.

वेळीच उपाय झाले नाहीत, तर हे केवळ एक नाट्यगृह नव्हे, तर पुण्याच्या सांस्कृतिक आत्म्यालाच गमावण्यासारखे ठरेल.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link