एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मंगळवेढा हादरला, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने पत्नीला संपवले पतीसह सासू-सासर्‍यावर गुन्हा दाखल, संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा)

मंगळवेढा हादरला, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने पत्नीला संपवले पतीसह सासू-सासर्‍यावर गुन्हा दाखल,
संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा)

प्रतिनिधी | मंगळवेढा संभाजी पूरीगोसावी

मंगळवेढा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे यामध्ये पत्नीला नांदायला घेवुन जाण्यासाठी पतीसह सासू-सासरे पाहुण्याच्या गावी आले होते. पत्नीच्या भावाने दारातच सास-याला मारहाण सुरू केल्यामुळे रागाच्या भरात पतीने धारदार चाकूने पत्नीच्या पाटीत, पोटात व कमरेत चाकू खुपसून गंभीर जखमी करून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरती अमोल ढेकळे पाटील (वय ३२, रा. मेटकरी गल्ली, मंगळवेढा) असे मयत पत्नीचे नाव आहे. या हाणामारीत मयताचा सासरा अंबादास पाटील (ढेकळेवाडी), भाऊ प्रसाद रामचंद्र
चौगुले व आई सोनाली रामचंद्र चौगुले (रा.मेटकरी गल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी तीन वाजता शनिवार पेठेत मयताच्या माहेरी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गेल्या चार-पाच वर्षांपासून विवाहित आरती ही माहेरी येथील शनिवार पेठेत आई-वडिलांकडे राहत होत्या. पती सोबत वाद होता. सासरी नांदण्यास घेऊन जाण्यासाठी म्हणून सासू-सासरे व पती आल्यानंतर सास-याला मेव्हणा प्रसाद चौगुले याने मारहाण केल्यानंतर रागाच्या भरात पती अमोल याने पत्नीच्या पोटात पाटीत व कमरेत धारदार शस्त्राने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तिला उपचाराकरिता प्राथमिक रुग्णालयात दाखल
केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी आरती यांना मयत घोषित केले. इतर जखमींवर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
आरती ढेकळे पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती समजताच तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link