अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी हंसराज पाटील
श्री भीमाशंकर मंदिर, शिवलिंग प्रतिष्ठान श्री क्षेत्र देहू येथील ” अखंड हरिनाम सप्ताहाची” उत्सहात सांगता…
श्री क्षेत्र देहू : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीजे निमित्त प्रति वर्षा प्रमाणे श्री भीमाशंकर शिवलिंग मंदिर देहूगांव येथे दिनांक 13/03/25 गुरवार पासून ते रविवार दिनांक 16/03/25 पर्यंत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमात पहाटे 04 ते 06 वाजेपर्यंत काकडा भजन सायंकाळी 05 ते 06 वाजेपर्यंत हरिपाठ रात्री 07ते 09 पर्यंत किर्तन व 10 नंतर सुस्वर भजनी मंडळाचे जागरा चे आयोजन करण्यात आले होते.
श्री भीमाशंकर शिवलिंग प्रतिष्ठान वर्षभर विवीध कार्यक्रमाचे आयोजन करते. तसेच मंदिरात दररोज संध्याकाळी आरती होते या मध्ये. लहान मुले, मुली, तरुण वर्ग आवर्जून उपस्थित राहतात त्यामुळे लहानपणापासून मुलामध्ये धर्माचे व आधात्माचे संस्कार मिळतात.
श्री क्षेत्र देहू हि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या मुळे पावन झालेली भूमी आहे या मुळे येथील वातावरण धार्मिकतेचे आहे हा वारसा शिवलिंग प्रतिष्ठान तर्फे पुढे चालवला जात आहे.
काल्याच्या किर्तनानंतर सर्व भाविक भक्तांना दिवसभर महाप्रसाद चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात सेवेत असणाऱ्या सर्व
महिला शक्तीचे शेवट च्या दिवशी सत्कार करण्यात आला.
शिवलिंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री नामदेव भाऊ शिंगाडे, श्री अतिश गभाले, श्री गणेश तळपे, श्री सचिन नायकवडी व मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी अखंड सेवारात राहून हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न केला…
