अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संभाजी पूरीगोसावी
मेढा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची बदली, सुधीर पाटील नवे कारभारी, पोलीस ठाणेला मिळाला खमक्या अधिकारी,तालुक्यातील मेढा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची अचानक बदली झाली असुन. स.पो.नि. पृथ्वीराज ताटे यांनी मेढा पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून मेढा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, मात्र गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यांत कास पठारावरील जय मल्हार हॉटेलमध्ये रात्री पार्टी बहादारांनी बारबाला नाचवून गाड्या फोडल्या या प्रकरणाची माहिती स.पो.नि. ताटे यांना असतानाही त्यांनी कारवाई केली नाही होती, याबाबत सातारा दैनिक तरुण भारत ने सडेतोड बातमी प्रसिद्ध करताच एकच खळबळ उडाली होती, दैनिक तरुण भारत च्या वृत्तपत्राने हाती घेतलेल्या वृत्ताला अखेर दिलासा मिळाला आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे बदली करण्यात आली आहे, मात्र अचानक झाल्यामुळे बदलीमुळे पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे, तत्पूर्वी मेढा पोलीस ठाणेचा चार्ज हा पोलीस उपनिरीक्षक पाटील मॅडम यांच्याकडे होता, अखेर स.पो.नि. पृथ्वीराज ताटे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशावरून मेढा पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला आहे, यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत सुधीर पाटलाचं नाव ऐकलं तरी भल्या,भल्या गुन्हेगारांना घाम फुटतो, त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील आत्तापर्यंत च्या कामगिरीची दखल घेवुन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या आदेशात आता मेढा पोलीस ठाणेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, मेढा पोलीस ठाणेला मिळालेले नवे प्रभारी अधिकारी सुधीर पाटलांना कर्तव्यदक्ष आणि खमक्या अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते, त्यांच्या नियुक्तीमुळे आता मेढा पोलीस ठाणेच्या हद्दीमधील आणि जावली तालुक्यांसह व परिसरांतील गुन्हेगारीला व अवैधरित्या विना परवाना अवैध धंदे वाल्यांना नक्कीच चाप बसणार
