एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील चंदनाचे झाडाची चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास सिंहगडरोड पोलीसांनी मुद्देमालासह शिताफिने केले जरेबंद

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात…!

संपादक सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ३५/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचे अनुशंगाने दिनांक १७/०१/२०२५ रोजी तपास पथकातील सहा पोलीस निरिक्षक, सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोहवा ३८८ केकाण, पोशि ८३४२ पाटील, पोशि ९१९१ क्षिरसागर, पोशि ९१८३ ओलेकर, पोशि ०३ मोहीते, पोशि ८६९० पांडोळे, असे सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत मा. वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, प्रयोजिसटी समोरील कॅनोल लगत वडगाव पुणे येथे एक संशयीत इसम थांबला असुन त्याचे जवळ एक पांढ-या रंगाच्या पोत्यामध्ये चंदनाचे झाडे कापण्याची हत्यारे आहेत अशी खात्रशिर बातमी मिळाल्याने हैं मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्यती पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने वरील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणी करता सदर ठिकाणी एक संशयीत इसम हा त्याचे खांदयावर पांढ-या रंगाचे पोते घेवुन एका आडबाजुस थांबलेला दिसला. त्यावेळी आम्हांस त्याचा संशय आल्याने आम्ही सोबतचे स्टाफचे मदतीने त्यास आहे त्या परिस्थितीत पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव भरत शिवाजी जाधव वय ३४ वर्षे रा. केडगाव चौफुला गडदेवस्ती ता. दौंड जि. पुणे असे असल्याचे सांगितले, त्याचे जवळ असलेल्या पांढ-या रंगाच्या पोत्यामध्ये तो काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्याने त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्याची पाहणी करता त्या मध्ये १,०००,००/- रुपये किंमतीचे अर्धवट तोडलेले चंदनाच्या झाडाचे तुकडे मिळुन आले, त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या चंदनाच्या झाडाच्या तुकड्या बाबत त्यांच्याकडे जागीच तपास करता त्याने सदरचे चंदनाचे तुकडे हे दि.१६/०१/२०२५ रोजी मानस धायरी परिसर येथुन चोरी

केल्याचे सांगितल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दि.१७/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द यवत पोलीस स्टेशन पुणे व हवेली पोलीस स्टेशन पुणे येथे देखील चोरीचे गुन्हे दाखल असुन पुढील अधिक तपास संतोष भांडवलकर, पोलीस उप निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा.श्री रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संभाजी कदम सोो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३. पुणे शहर श्री. अजय परमार सो।, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. दिलीप दाईंगडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर, यांचे पथकाने केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link