अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
विदेशी गावठी कट्टा पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपींच्या वाई पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या, वाई पोलिसांची कामगिरी, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. वाई पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर साहेब यांना बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहिंतीच्या आधारे वाई पोलीस ठाणे मौजे.एकसर गावच्या बस स्थानक परिसरांत एक संशयित इसम हा विनापरवाना विदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि देशी बनावटीचे पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर यांनी वाई पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकांला सूचना दिल्या, यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकांचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली यावेळी संशयित इसम हा फिरत असल्यांचे दिसून आले सदर आरोपींला सापळा लावून ताब्यांत घेण्यात आले असता. त्यांस वाई पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ विदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर 1 .20.000 / रुपये किंमतीची दोन्हीही अग्निशस्त्र ताब्यांत घेण्यात आली आहेत. राजेश शंकर सणस रा. एकसर ता. वाई जि. सातारा) असे आरोपींचे नाव आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ .वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे पोलीस हवालदार अजित जाधव,राम कोळी हेमंत शिंदे,प्रसाद दुदुसकर,नितीन कदम,श्रावण राठोड,धीरज नेवसे,विशाल शिंदे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, वाई पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे
