मधुतारा फाउंडेशन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य : संपादक – संतोष लांडे/किरण सोनवणे.
21 ऑक्टोबर 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांच्या* *वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे सर यांच्या वतीने कुबड्या आणि वॉकर याचे वाटप करण्यात आले.वॉकर साठी आस्क निराधार आश्रम कर्मवीर दादा गायकवाड साहेब यांच्या वतीने सहकार्य करण्यात आले.
या वेळी गंगानगर भेक्राई पुणे येथील 75 वर्षीय ज्येष्ठ दिव्यांग एके काळी मुंबई पुणे टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष असलेले श्री माणिकजी यादव साहेब यांना वॉकर.ससून हॉस्पिटल मध्ये पायाच्या टाचाचे ऑपरेशन झालेल्या श्री संजयजी साबळे साहेब रा. ताडीवालारोड पुणे यांना ससून हॉस्पिटल मध्ये वॉकर.खुब्यापासून पाय काढलेले तरुण श्री राष्ट्रपालजी गायकवाड साहेब यांना त्यांच्या शनिवार पेठ येथील काम करत असलेल्या दुकानात कुबड्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी पुणे शहरात विविध ठिकाणी मधु तारा प्रमुखांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.