एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद मेळावा अमरावती येथे संपन्न 

अमरावती | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज |  ज्योत्सना करवडे (प्रतिनिधी)

आज दिनांक १८/१०/२०२४ रोजी अमरावती येथे अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद मेळावा संताजी प्रार्थना मंदिर येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळासाहेब कांबळे चेअरमन अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य विशेष अतिथी मा श्री संदीप केदारे ,मा श्री देवेंद्रजी तिवारी, मा श्री शरद तसरे माजी विधानसभा उपाध्यक्ष, मा श्री चेतन भाऊ पवार माजी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती ,मा एडवोकेट चंद्रिका बैस माजी सदस्य नागपूर ग्राहक निवारण आयोग, मा श्री देवीदास मालखेडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मा डॉ अलबिना हक, प्रमुख अतिथी मा श्री विख्यात सनई नॅशनल चेअरमन अ. भा. ग्रा. क. परिषद, मा श्री सुरज प्रकाश, मा श्री अविनाश पारखे, मा श्री सुभाष अग्रवाल, मा श्री मिलिंद खेकाळे, मा श्री विजय बैस, मा श्री दिलीप डहाके, अमोल पाटील, श्री संजय जाधव, श्री दिलीप निगोट, सौ प्रमिला डोंगरे, सौ ज्योत्स्ना करवाडे इत्यादी मान्यवर हजर होते.

सदर कार्यक्रमांमध्ये ग्राहक संरक्षण कायदा २०१९ याबाबत कार्यशाळा घेण्यात आली प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राहकांची चालू असलेली फसगत या विषयावर प्रकाश टाकण्यात आले, ही परिषद जनतेसाठी काय काय काम करते त्याची नियमावली सांगण्यात आली, प्रत्येक विभागाची कार्यकारिणी समिती तयार करण्यात आली या समितीचे ध्येय ग्राहकांना काही समस्या असतील तर आपण कुठल्याही राज्यामधले आणि जिल्ह्यातील असले तरी प्रत्येक ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता तत्पर राहील. या कार्यक्रमांमध्ये श्री गजानन मुदगल अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अमरावती यांची पदोन्नती अमरावती विभाग अध्यक्ष म्हणून करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा गोडबोले यांनी केले. आभार प्रदर्शन ऍड प्रभाकर वानखडे यांनी केले हा कार्यक्रम सु व्यवस्थित पार पडावा याकरिता अमरावती शहर टीमने अथक परिश्रम घेतले. व मेळावा कार्यक्रम छान पार पडला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link