एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा सन्मान पुरुषार्थाचा कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

अक्षय जाधव । अजिंक्य महाराष्ट्र न्यूज़ । प्रतिनिधी प्रशांत काजळे

आळंदी अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून आळंदी शहरात अश्वमेघ फाऊंडेशन आयोजित भव्य आर. जे अक्षय प्रस्तुत कॉमेडी नाईट्स आणि खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आळंदी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमाला बंपर बक्षीसची लयलूट करण्यात आली. यावेळी दोन दुचाकी, त्याच बरोबर छोटी मोठी अशी पन्नास बक्षिसे ठेवण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हून अभिनेत्री अश्विनी महांगडे व अभिनेत्री माधवी निमकर या उपस्थिती होत्या. नागरिकांचा उदंड प्रतिसाद बघता अक्षय जाधव यांनी विधानसभेसाठी चांगलीच मोर्चे बांधणी केली असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख धनंजय पठारे, शिवसेना महिला आघाडी वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख मनीषा परांडे, भाजपा नेते राम गावडे, शिवसेना उपतालुका प्रमुख दत्ता राऊत, युवती तालुका प्रमुख आरती कांबळे, राहुल थोरवे, शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सावंत, आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण, राजगुरूनगर महिला शहरप्रमुख नयना झनकर, युवती महिला उपतालुका प्रमुख मनीषा थोरवे, युवती सेना विभाग प्रमुख श्रद्धा थोरवे, आळंदी नगरपरिषद नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, नगरसेविका सुनीता रंधवे, नगरसेविका रुख्मिणी कांबळे, पुष्पाताई कुऱ्हाडे, शिवाजी पगडे, नितीन ननवरे, सायरा शेख, स्मिता थोरवे, युवा सेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक महिला व पुरुष बांधव उपस्थिती होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link