प्रतिनिधी प्रशांत काजळे.
पिंपरी चिंचवड चिखली येथील गाथा कॉलनी व सोनवणे वस्ती येथे ३१५ KVA क्षमतेचा ट्रान्सफार्मर काढून नव्याने ६३० KVA चा ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडला. या ट्रान्सफार्मरमुळे चिखली परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.
यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, अंकुशराव मळेकर, विनायक आबा मोरे, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर, जितुभाऊ यादव, संजीवन सांगळे व चिखली परिसरातील नागरिक उपस्थित होते.