ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाकडून सुरक्षितेचे आवाहन.
प्रतिनिधी / अनिल चव्हाण.
सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना काम मिळत नाही. बेरोजगारी वाढल्या मुळे चोरीचे घरफोडी चे घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने मानवत पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक दर्शन शिंदे यांनी केले आहे.
मानवत शहरासह तालूक्यातील
सर्व ग्रामीण भागातील सर्व व्यापारी, दुकानदार यांनी सुरक्षितेच्या उपाय योजनेसह आपल्या दुकानात रोख रक्कम, किंवा मौल्यवान वस्तू ठेऊ नये. दुकानात व बाहेर Cctv कॅमेरे बसवावेत, कॅमेरा दुकानाचे शटर पुरता मर्यादित न ठेवता रोड कव्हर करेल असा एक कॅमेरा बसविण्यात यावा.
घरी कोणी नसताना, घरात देखील रोख रक्कम दागिने ठेऊ नयेत.
घरून बाहेर कुठे जात असेल तर शेजारी यांना घराकडे लक्ष ठेवणे बाबत सांगावे. चोरटे शक्यतो बंद घरी चोरी करीत असतात.
बाहेर जात असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये.
शेतात आखाड्यावर देखील सोबत रोख रक्कम, दागिने ठेऊ नयेत, यापूर्वी आखाड्यावर रेकी करून मारहाण करून पैसे, दागिने लुटण्याचे प्रकार घडले आहेत.
घरात देखील कोणी अनोळखी व्यक्ती कोणत्याही कारणास्तव आल्यास त्यास प्रवेश देऊ नका, अश्या व्यक्ती काहीतरी भुरळ पाडून, किंवा घरात एखादी एकटी महिला किंवा वयस्क व्यक्ती असल्यास लुटण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत.
ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल स्थापन करून रात्रीच्या वेळी सतत पेट्रोलिंग ठेवावी, कारण प्रत्येक गावात पोलीस पोहचणे श्यक्य नाही.

आपली चार चाकी, दुचाकी वाहने यांना चांगल्या प्रकारचे लॉक बसवून घ्यावे, GPS बसवावे.
वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावेत.
सुरक्षित राहा, सतर्क राहा.
कोणी संशयित फिरत असल्यास मदतीसाठी डायल 112 नंबर वर फोन करावा. असे आवाहन मानवत पो.स्टेचे पोलिस निरिक्षक दर्शन शिवाजीराव शिंदे यांनी केले आहे.








