न्हावरा येथे महिलेचा अकस्मात मृत्यू; तणनाशक औषध घेतल्याने उपचारादरम्यान निधन
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील गायकवाडवस्ती परिसरात एका महिलेचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत महिलेचे नाव अर्चना विठ्ठल गायकवाड (वय 34 वर्षे, रा. न्हावरा, गायकवाडवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे.
याबाबत विठ्ठल शिवाजी गायकवाड (वय 39 वर्षे, व्यवसाय शेती, रा. न्हावरा, गायकवाडवस्ती) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 28/06/2026 रोजी सकाळी राहत्या घराच्या समोरील पडवीमध्ये अर्चना गायकवाड यांनी खोकल्याचे औषध समजून तणनाशक औषध घेतले. त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी शिरूर येथील चोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तणनाशक औषध घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू क्रमांक 103/2026, बी.एन.एस.एस. कलम 194 प्रमाणे करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार (398) करत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार उबाळे (1898) यांनी काम पाहिले.








