एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा.दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा.दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

प्रतिनिधी लाडलेसाब नदाफ

शिराढोण पोलीस ठाणे : पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कोळेकर यांच्या पथकाने शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 11.06.2026 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, नायगाव शिवारातील नायगाव ते मुरुड कडे जाणारे रोडवर रॉयल लॉज येथे हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर 18.16 वा. छापा टाकला असता लॉज मध्ये दोन महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता आरोपी नामे- अक्षय दादासाहेब घोगरे, रा. मुरुड ता. जि. लातुर, लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ, रा. मुरुड ता. जि. लातुर यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद दोघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने नमुद आरोपींना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, रोख रक्कम 5,300 व निरोधची पाकीट असा एकुण 15,420₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन आरोपी नामे- अक्षय दादासाहेब घोगरे, रा. मुरुड ता. जि. लातुर, लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ, रा. मुरुड ता. जि. लातुर यांचेविरुध्द गुरनं 141/2026 बी.एन.एस सह 143, 144(2), 3 (5) सह कलम 3, 4, 5, 6 मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात दि. 11.06.2026 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री कोळेकर पोलीस ठाणे शिराढोणचे पोलीस पथकाने केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link