धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेवून मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील ६ आरोपीतांना अटक करून त्यांचे कडून ५२ मोबाईल
हस्तगत करून मुंबई शहरातील एकून १६ गुन्हे उघडकीस आणलेबाबत
प्रतिनिधी रणजीत मस्के
सर जे जे मार्ग पोलीस ठाणे हददीत दिनांक २६/०२/२०२६ रोजी फियार्दी नामे श्री. अब्दुल रहमान असलम सय्यद, वय २१ वर्षे, रमजान महिना चालू असल्याने नेहमी प्रणाने सायंकाळी सहा वाजता इफ्तारीचे सामान खरेदी करण्यासाठी बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार, जे जे, मुंबई. येथे गेले असता अज्ञात चोरटयांनी त्यांच्या पॅन्ट च्या खिशात ठेवलेला रेडमी ११ टी मोबाईल फोन लबाडीच्या इरादयाने चोरी केला म्हणून सर जे जे मार्ग पोलीस ठाणे यथे गुर क्र १५२/२०२६ कलम ३०३ (२) भा न्या स. अन्वये नोद करण्यात आला.
गुन्हयाचा तपास करीत असतांना सर जे जे मार्ग पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी प्रशांत नेरकर व पथकाने सलग ०३ दिवस बोहरी मोहल्ला नळ बाजार, मस्तान तलाव व इतर गर्दीचे ठिकाणी वेशांतर करून सापळा रचण्यात आला होता. दिनांक ०२/०३/२०२६ रोजी सांयकाळी मस्तान तलाव या ठिकाणी एक इसम संशईत रित्या पो उप नि प्रशांत नेरकर यांना फिरतांना दिसून आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांची पूर्ण ०६ जणांची आंतरराज्यीय टोळी असल्याचे समजले. तात्काळ दोन पथके तयार करून नमुद टोळीतील इतर सदस्य उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना कूर्ला रेल्वे स्टेशनहून शिताफिने पाच साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून तपास केला असता सदर टोळक्याने मुंबई मध्ये वेगवेळ्या ठिकाणी राहण्यासाठी रूम घेतल्याचे तपासात आढळले. नमुद आरोपींताकडे आतापर्यंत एकून ५२ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून मुंबई शहरातील एकून १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नमुद आरोपी हे मुंबई मध्ये साजरे होणारे धार्मिक सण, राजयकीय सभा व इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेवून मोबाईल चोरी करून भारतीय सीमेलगत नेपाळ व बाग्लादेश या देशांमध्ये त्यांचे हस्तकामार्फत विक्री करीत असल्याबाबत आतापर्यतच्या तपासात माहिती मिळाली आहे. त्याबाबत अधिक तपास चालू आहे.
अटक आरोपी माहिती ..
१) साकीब अशफाक खान, वय ३० वर्षे, धंदा सिलाईकाम, रा.ठी. रूम १०१/४२, कुकणीपार, कल्लारीगंज, कानपुर, उत्तर प्रदेश. २) सरताज सरफराज शेख, वय २७ वर्षे, रिक्षाचालक, रा.ठी. छीपयाना, कसाई मोहल्ला, जि. उनाव, उत्तर प्रदेश ३) आमीर आबिद खान, वय ४१ वर्षे, धंदा शिलाईकाम, रा.ठी. रूम ९६/३८ चमनगंज, कर्नलगंज, जि. कानपुर, उत्तर प्रदेश. ४) इस्तीयाक सादिक खान, वय ३७ वर्षे, धंदा बिगारीकाम, रा.ठी. – कब्रस्तान गल्ली, अमृत नगर, कौसा जि ठाणे. ५) गोहर गुलाम जिलानी, वय ४८ वर्षे, धंदा सिलाईकाम, रा.ठी. रूम १०१/३२१ पेशकार रोड, कर्नलगंज, जि. कानपुर, उत्तर प्रदेश. ६) अफजल उस्मान नाई, वय ३५ वर्षे, धंदा न्हाव्की, रा.ठी. गडीया कृतवाली ठाणा, जि. बुन्नोज, राज्य उत्तर प्रदेश.
उपरोक्त चागंली कामगीरी मा. पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त का व सुश्री सत्य नारायन चौधरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग डॉ. श्री अभिनव देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ डॉ. श्री प्रविण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डोंगरी विभाग तनवीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुकुंदा वाघमोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रशांत नेरकर (गुन्हे प्रकटीकरण अधिकारी) पो ह. नियाजुददीन तडवी, पो ह सचीन पाटील, पो शि मंदार घाडगे, पो शि प्रविण शेवरे, पो शि दिपक डावरे, पो शि भरत चौधरी, पो शि गणेश दळवी यांनी पार पाडली आहे.








