एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कोल्हापुरांत अनैतिक संबंधातून महिलेचा खून, आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात

*कोल्हापुरांत अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून, आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात! संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यांत भडगांव येथील सौ. सुनीता संजय केसकर (वय 40) हिचा मृत्यू वनप्राण्यांच्या हल्ल्यातून झाल्याचे बनाव अखेर गडहिंग्लज पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी आणि सुनीता केसकर या दोघांचे सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते मात्र प्रियकरानेच तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी (वय 34 )रा. भडगांव याला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. सुनुता ही 18 जानेवारी आठवडी बाजारीसाठी घरांतून बाहेर पडली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर 21 दिवसांनी महागांव जंगलातील झरा ओढ्यात तिचा मृतदे आढळला. सुरुवातीला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र मृतदेहावर दागिने व मोबाईल नसणे, तसेच ती व्यक्ती जंगलात जाण्याची शक्यता कमी असल्याने पोलिसांना चांगलाच संशय आला. मात्र तपासाच्या अनुषंगाने सुनीता व प्रवीण यांच्यात अनैतिंक संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यात दागिने व मोबाईल काढून टाकल्यानेच आरोपीचा खरा बनाव उघड झाला आहे. आणि गडहिंग्लज पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे हा खून उघडकीस आला आहे.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link