एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मोका गुन्हेतील चार महिन्यांपासून फरार असणाऱ्या आरोपी शेखर ठोंबरेच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने आवळल्या मुसक्या

मोका गुन्हेतील चार महिन्यांपासून फरार असणाऱ्या आरोपी शेखर ठोंबरेच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

दिनांक :०६/०२/२०२६

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी मोका गुन्हयामध्ये ४ महीन्यापासुन पाहीजे असलेला आरोपी शेखर ठोंबरे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ४२५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (४), ३५१ (३), ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, क्रिमीनल लॉ अमॅन्टमेंट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ चे कलम (१) (ii), ३(२), ३(४) या गुन्हयातील टोळी प्रमुख चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे वय २८ वर्षे, रा. कदम चाळ, गल्ली नंबर ५, संतोषीमाता मंदिरा जवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे याचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक मोकाशी यांना मा. वरीष्ठांनी आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने तपास पथकाचे पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, किरण साबळे यांना मागील ४ महीन्यापासुन पाहीजे असलेला ठोंबरे टोळीचा प्रमुख शेखर ठोंबरे हा प्रयेजा सिटी, एस.आर.ए बिल्डींग, वडगाव, पुणे या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्याबाबत मा. वरीष्ठांना माहीती देवून सदर ठिकाणी सापळा लावुन नमुद आरोपीस शिताफीने पकडून त्यास गुन्हयाचे तपासी अधिकारी मा.धन्यकुमार गोडसे साो, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग, अतिरीक्त कार्यभार भारती विद्यापीठ विभाग पुणे यांनी अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साों मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. धन्यकुमार गोडसे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे अतिरीक्त कार्यभार भारतो विभाग, पुणे. यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, अभिनय चोधरी, यांच्या पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link