*गांजा विक्री करणाऱ्या आरोपींच्या मोटारसायकलसह महात्मा गांधी चौकी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 100,000 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत ! संभाजी पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ) सांगली जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत संशयित नवाज सलीम मकानर (वय 32) रा. प्रताप कॉलनी रॉकेल डेपो मिरज ) यांस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 2 किलो वजनाच्या गांजा मुद्देमालासह 100,000/ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलीस प्रशासनाची देखील अवैध धंद्यावर चांगलीच करडी नजर दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एक संशयित इसम आपल्या मोटरसायकल वरून गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव अभिजीत धनगर सचिन कुंभार नानासाहेब चंदनशिवे बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण मोसीन टिनमेकर राजेंद्र हारगे अमोल तोडकर चालक निवास माने देवानंद नागरगोजे आदीं पोलिसांनी या कारवाईस सहभाग घेतला महात्मा गांधी चौकीच्या पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.*
लाइव टीवी
लाइव क्रिकट स्कोर
Weather Data Source: Wetter Indien 7 tage
Follow us on
Quick Link







