एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सेलू नगर पालिकेच्या कत्तलखान्यावर पोलीसांचा छापा,तीन गोवंशाची कत्तल उघड

सेलू नगर पालिकेच्या कत्तलखान्यावर पोलीसांचा छापा,तीन गोवंशाची कत्तल उघड.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

एका अल्पवयीन आरोपीसह ६ जणांवर गुन्हा दाखल.४लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

सेलू : सेलू शहरातील एकबाल नगर मध्ये असलेल्या नगरपालि केच्या कत्तलखान्यात ३गोवंश प्राण्याचे मास आणि कत्तली साठी आणलेली तेरा जनावरे आढळून आले असून यांची वाहनासह ४ लाख १४ हजार रुपयाची मालमत्ता पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. ही घटना गुरुवार २२ जानेवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून गुन्हा दुपारी ४ वाजता दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे संपूर्ण राज्यात गोवंश बंदी असतांना देखील येथील काहीजणांनी नगरपालिकेच्या दिलेल्या कत्तलखान्यात बुधवार २२ जानेवारी रोजी ३ गोवंश जनावरांची हत्या करून शेजारी एका ठिकाणी उर्वरित १३ गोवंश जनावरे उपाशी ठेवून बांधले होते. सदर घटनेची माहिती पोलीसांना कळताचउपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार ,पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कीर्तेश्वर तेलंगे, पोलीस हवालदार सुरेश पुलाते,पोलीस हवालदार मधुकर जाधव, पोलीस हवालदार अजय रासकटला, पोलीस हवालदार नितीन राठोड, पोलीस नायक कुंडलिक साबळे ,पोलीस नायक मनोहर कोपनार, चालक जगन्नाथ मुंडे आणि अतिख शेख यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. घटनास्थळी गोवंश प्राण्याच्या कापलेल्या मासाचा ढिग व उर्वरित अवयव पडलेले होते. तर इतर ठिकाणी उपाशी बांधून ठेवलेले १३ गोवंश आढळून आले.यावेळी संपूर्ण मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही बोलावण्यात आले. एकूण ४ लाख १४हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किर्तेश्वर तेलंगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुरनं ३६/२०२६ कलम ५/सि,६९/ए, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११/१ड अन्वये अब्दुल रहेमान बाबू कुरेशी, साबेर शरीफ कुरेशी, साहिल खलील कुरेशी, शफिक खलील कुरेशी, इब्राहिम हिराजी कुरेशी, गोस जलाल कुरेशी सह उमर मालनजी कुरेशी वय १६ वर्षे राहणार सर्व सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख हे पुढील तपास करत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link