एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डॉक्टरला लुटणाऱ्या दोघांना शिताफीने ठोकल्या बेड्या, पुणेतील सहकारनगर पोलिसांची दमदार कामगिरी

डॉक्टरला लुटणाऱ्या दोघांना शिताफीने ठोकल्या बेड्या, पुणेतील सहकारनगर पोलिसांची दमदार कामगिरी

डॉक्टर ला लुटणा-यांना सहकारनगर पोलीसांनी केले जेर बंद

दि.०१/०१/२०२६ रोजी सहकारनगर पोलीस ठाणे हददीतील वैदयकीय प्रॅक्टीस करणारे डॉक्टरांना दोन अज्ञात व्यक्तींनी फोन करुन “त्यांची आई आजारी असल्याचे सांगुन” तपासणीसाठी होम व्हीजीट देणे बाबत पुणे सातारा रोडलगत असलेल्या अथर्व फरिहाज बिल्डींग होंडा शोरुमच्या बाजुला, बोलावुन घेतले होते. डॉक्टर सदर ठिकाणी पोहचले असता, अंधाराचा फायदा घेवून सदर दोन इसमांनी डॉक्टर ला चाकुचा धाक दाखवुन, डॉक्टरला लुटण्याची घटना घडली होती सदर वेळी अज्ञात आरोपींनी डॉक्टरने आनलेली बी. एम. डब्ल्यु, मोटार सायकल, मोबाईल, सँग व सँगमध्ये असलेला चांदीचा जग व रोख रक्कम असा एकुण४,५०,२००/- रुपये किंमतीचा ऐवज लुटुन नेला होता.

सदरबाबत डॉकटरांचे फिर्यादी वरुन स.नगर पो. स्टेशन गु.र.नं.०१/२०२६ भा.न्या. संहिता कलम-३०९ (६) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करुन तात्काळ तपास सुरु करण्यात आला. सदरचा तपास वपोनि श्री. विठठल पवार, पोनि गुन्हे श्री. जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोउपनि सददामहुसेन फकीर, गणेशकर्चे व तपास पथकातील अंमलदार यांनी तांत्रीक विश्लेषनाचे आधारे व सी.सी.टि.व्ही. फुटेज व्दारे कसुन तपास केला असता सदर तपासा दरम्यान संशयीत आरोपी अ.क्र.१) गीरंग किरण देसाई वय-२५ धंदा-कॉल सेंटर रा. राजयोग सोसा. ए विंग, फ्लॅट नं. २९, कदम प्लाझा समोर कात्रज पुणे व आरोपी अ.क्र.२) शुभम उमेश शिंदे वय २८ रा. सर्वे नं.०८ साई नगर साळवे गार्डन जवळ कोंढवा पुणे. यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केला असल्याच ‘कबुल केले. त्यानंतर सदर आरोपींना अटक करुन त्यांचे कडुन वरील नमुद गन्हयातील गेला माल बि.एम.ड.ब्ल्यू.मो.सा..एक मोबाईल, रोख रक्कम, व चांदीचा जग असा एकुण ४.२१,७४०/- रु. कि. मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे सदर आरोपींनी गुन्हा करणेसाठी इतर राज्यातील मोबाईल फोन व सिम कार्ड चा उपयोग केला असल्याचे निष्पंन्न झाले आहे. अशा प्रकारे सुनियोजीत पध्दतीने केलेल्या क्लिस्ट गुन्हयाची उकल सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेषकुमार सो., मा. सह. पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा सो.मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे साो, मा. पोलीस उपआयुक्त परि-२, श्री. मिलींद मोहीते सोो. मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग-श्री. धन्यकुमार गोडसे सो, सहकारनगर पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठठल पवार सो, पालीस निरीक्षक गुन्हे श्री राजुरकर सो. यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, पोलीस उपनिरीक्षक-सददामहुसेन फकीर, सहा. फौज./१२६८ बापुसाहेब खुटवड, पो. हवा. /५७७ अमोल पवार, पो. हवा./६९४२ चंद्रकांत जाधव .पो.हवा. किरण, कांबळे, पो. हवा. निलेश शिवतारे, पो. अं. /२५१० अभिमान बागलाने, पो. अं/२१७६ किर्तीकर, पो.अं./८७९८ पदमाळे, पो.अं. / ४४२८ भगत, पो. अं./८७१० सागर सुतकर, पो. अं./१०२५२ ढोले, पो. अं/२५१० मारुती नलवाड, पो. अं./१९रफिक तडवी, पो. अं /१०२२१ बालाजी केंद्रे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक सददामहुसेन फकीर हे करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link